पाचवी टेस्ट रद्द, टीम इंडियाला कोरोनाचा धोका

टीम इंडियामधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने इतरांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता असल्याने टेस्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

    टीम इंडियाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खेळाडूंना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाचवी टेस्ट रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या टेस्टबाबत दोन दिवस चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    भारत आणि इंग्लंड दरम्यान होणारी पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची टेस्ट मॅच रद्द करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. टीम इंडियामधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने इतरांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता असल्याने टेस्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भारतीय टीम मैदानात उतरु शकणार नाही असेही इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या पत्रामध्ये म्हटले आहे.