नोव्हाक जोकोविच आणि मातेयो बेरेटिनीमध्ये अंतिम लढत, सामना कधी, कुठे?

विम्बल्डनमध्ये  महिला एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीने(Ashleigh barty) चेक रिपब्लिकची कॅरोलिना प्लिस्कोवा (Karolina Pliskova) हिला नमवत पहिल्यांदाच विम्बल्डनचा खिताब पटकावला. त्यानंतर आज (रविवारी) पुरुष एकेरीची अंतिम लढत आहे.

    हा सामना वर्ल्ड चॅम्पियन आणि नुकताच फ्रेंच ओपनवर नाव कोरलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) इटलीच्या मातेयो बेरेटिनी (Matteo Berrettini) विरुद्ध खेळणार आहे. भारतातही टेनिसचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे या जगातील महत्त्वाच्या टेनिस स्पर्धेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

    या सामन्याचा विचार करता 19 वेळा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविच सामना करत असलेल्या इटलीच्या मातेयोने पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.