… अखेर बीसीसीआयने व्हिवो कंपनीसोबतचा करार मोडला?

  • बीसीसीआयने व्हिवो या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार मोडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यासंदर्भात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक जाहीर करत माहिती दिली आहे. गेली काही वर्षं आयपीएलसाठी व्हिवो ही चिनी मोबाईल कंपनी स्पॉन्सरशिप देत होती.

युएईमध्ये सप्टेंबर महिन्यात रंगणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगासाठी बीसीसीआयने व्हिवो या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार मोडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यासंदर्भात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक जाहीर करत माहिती दिली आहे. गेली काही वर्षं आयपीएलसाठी व्हिवो ही चिनी मोबाईल कंपनी स्पॉन्सरशिप देत होती.

परंतु या वर्षीच्या आयपीएलच्या १३  व्या हंगामासाठी व्हिवोचं प्रायोजकत्व घेणार नसल्याचं बासीसीआयने स्पष्ट केलं आहे. २०१८ साली बीसीसीआय आणि व्हिवो कंपनीचा ५ वर्षांचा करार झाला होता. परंतु आता एक वर्षासाठी व्हिवो आयपीएलला स्पॉन्सर करणार नाही हे ठरवण्यात आलं आहे. आपीएल स्पर्धेचं प्रायोजकत्व व्हिवो कंपनीकडे होते. त्यासाठी या कंपनीने बीसीसीआयला २२०० कोटी रुपये दिले होते. पण आता हा करार मध्येच संपुष्टात आला आहे.

बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी सामोपचाराने यावर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. या वर्षाच्या मोबदल्यात व्हिवो कंपनीसोबतचा करार २०२३ पर्यंत वाढवता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत एकूण १० डबल हेडर्स सामने खेळवले जाणार असल्याचं सांगतिलं जात आहे.