वर्षातील पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव, सलग १२ विजयानंतर पाहिलं पराभवाचं तोंड

भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांनी टी-२० मालिका खेळवली जातेय. यातील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा साामना करावा लागला. टीम इंडियानं यापूर्वी सलग १२ टी-२० सामने जिंकले होते. तेराव्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. यापूर्वी ८ डिसेंबर २०१९ या दिवशी वेस्ट इंडिजनं टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर थेट या टी-२० सामन्यात भारतानं पराभवाचं तोंड पाहिलं.

    जगातील सर्वोत्तम संघ असं बिरुद मिरवणाऱ्या टीम इंडियाची २०२१ या वर्षातील टी-२० ची सुरुवात पराभवानं झालीय. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने ८ विकेट राखून हा सामना सहज जिंकला आणि भारताला मायदेशात पराभवाला सामोरं जावं लागलं.

    भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांनी टी-२० मालिका खेळवली जातेय. यातील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा साामना करावा लागला. टीम इंडियानं यापूर्वी सलग १२ टी-२० सामने जिंकले होते. तेराव्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. यापूर्वी ८ डिसेंबर २०१९ या दिवशी वेस्ट इंडिजनं टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर थेट या टी-२० सामन्यात भारतानं पराभवाचं तोंड पाहिलं.

    अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतानं टॉस हरला होता. इंग्लंडनं टॉस जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं सुरुवातीला फलंदाजी करताना ७ विकेट गमावत १२४ धावा केल्या. हे लक्ष्य टीम इंग्लंडनं १५.३ ओव्हरमध्येच पूर्ण केलं आणि ८ गडी राखत भारतावर विजय मिळवला. जोफ्रा आर्चरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यानं केवळ २३ धावा देत ३ गडी बाद केले.

    इंग्लंडनं आक्रमक बॅटिंगसह खेळाला सुरुवात केली. पॉवर प्लेचा पूर्ण उपयोग करत त्यांनी ५० धावा तडकावून काढल्या. त्यामुळे त्यांना लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं झालं. जेसन रॉयच्या ७२ धावा आणि बटलरच्या २८ धावांसह ओपनिंग जोरदार झाल्यामुळे इंग्लंडला मानसिक बळ मिळालं. हे दोन ओपनर बाद झाल्यानंतर इंग्लंडनं एकही विकेट गमावली नाही आणि १५ व्या षटकातच सामना जिंकला.