टीम इंडियाला पहिला जोरदार झटका, हिटमॅन रोहित शर्मा कॅच आऊट

सलामवीर रोहित शर्मा कॅच आऊट झाला असून टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. बेन स्टोक्सने रोहितला विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट केलं. रोहित आऊट झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे.

    पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (Ind Vs Eng) यांच्यात पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. सलामवीर रोहित शर्मा कॅच आऊट झाला असून टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. बेन स्टोक्सने रोहितला विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट केलं. रोहित आऊट झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला आहे.

    ही पहिली वनडे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम बॅटिंग करत आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने अर्धशतकी सलामी भागीदारी केली. या दोघांनी टीम इंडियाला आश्वासक सुरुवात मिळवून दिली होती.

    पहिल्या १० ओव्हरमध्ये टीम इंडियाने ३० धावा केल्या होत्या. रोहित शर्मा १९ तर शिखर धवन २० धावांवर खेळत होते. परंतु टीम इंडियाला पहिला धक्का बसला असून इंग्लंडला पहिली विकेट घेण्यात मोठं यश मिळालं आहे.