गांधी जयंतीनिमित्त पंजाब नॅशनल बँकेने आयोजित केली फिट इंडिया फ्रीडम रन 2.0

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आला आणि गांधी जयंतीनिमित्त संपन्न झाला. लाखो लोकांनी ठरलेल्या वेळेत तसेच वर्चुअल माध्यमातून या रन 2.0 मध्ये भाग घेऊन हा कार्यक्रम भव्य यशस्वी केला.

  • द्वारका येथील पीएनबीच्या मुख्यालयापासून सुरुवात
  • रन 2.0 मध्ये पीएनबी हॉकी संघ आणि पीएनबीचे कर्मचारी सहभागी

मुंबई : महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) चे कर्मचारी सहभागी झाले होते. आजची रन केंद्र सरकारने सुरू केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचा एक भाग आहे. तंदुरुस्तीच्या प्रतिबद्धतेचे प्रतिबिंबित करत बँकेने गेल्या महिन्यातही अशाच प्रकारचे आयोजन केले होते.

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आला आणि गांधी जयंतीनिमित्त संपन्न झाला. लाखो लोकांनी ठरलेल्या वेळेत तसेच वर्चुअल माध्यमातून या रन 2.0 मध्ये भाग घेऊन हा कार्यक्रम भव्य यशस्वी केला.

यावेळी बोलताना पीएनबीचे कार्यकारी संचालक विजय दुबे म्हणाले ‘फिटनेसचा डोस, अर्धा घंटा रोज’ या घोषवाक्यातून स्पष्ट होते, पीएनबी कुटुंबातील लोकांनी, कर्मचारी यांनी निरोगी आणि तंदुरुस्त संस्था तयार करण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे शारीरिक फिटनेस साठी वेळ काढला पाहिजेत. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम आरोग्य केवळ आजच्या अनिश्चित काळात चांगल्या जीवनासाठी आवश्यक नाही, तर ते तुम्हाला जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ देते.