टीम इंडियाकडून इंग्लंडला पाच धक्के, डेव्हिड मलान 31धावांवर बाद

इंग्लंडने 17 षटकात 3 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली होती. आजच्या दुसऱ्याच षटकात उमेश यादवने नाईट वॉचमन क्रेग ओव्हर्टनला झेलबाद केलं. इंग्लंडने पाचवी विकेट गमावली आहे. खेळपट्टीवर सेट झालेल्या डेव्हिड मलानला उमेश यादवने रोहित शर्माकरवी झेलबाद केलं आहे.

    टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हल मोदानात सुरु आहे. पहिल्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक आणि अखेरच्या काही षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने 57 जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं.

    फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवातदेखील चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहने चौथ्याच षटकात इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर बाद करत टीम इंडियाची स्थिती मजबूत केली. इंग्लंडने 17 षटकात 3 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली होती. आजच्या दुसऱ्याच षटकात उमेश यादवने नाईट वॉचमन क्रेग ओव्हर्टनला झेलबाद केलं. इंग्लंडने पाचवी विकेट गमावली आहे. खेळपट्टीवर सेट झालेल्या डेव्हिड मलानला उमेश यादवने रोहित शर्माकरवी झेलबाद केलं आहे.