Ronaldo also 'champion' on Instagram; The only player with 300 million followers

सामन्यानंतर रोनाल्डोने सांगितलं की, मी खूप आनंदीत आणि प्रफुल्लित आहे. नवीन विक्रमाची नोंद केल्यामुळे नव्हे तर त्या विशेष आठवणींसाठी ज्या आम्हाला मिळाल्या आहेत. सामनाच्या शेवटी दोन गोल करणे एवढे कठीण असते की...

    दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोलचा विक्रम केला आहे. रोनाल्डो पेनल्टीवर गोल करण्यापासून हुकला, तरीसुद्धा विश्व क्वालिफाईंग ग्रूप-ए मध्ये आयर्लंडवर पोर्तुगीजने २-१ ने मात केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करण्यात रोनाल्डोला यशप्राप्ती मिळाली आहे. रोनाल्डोने ८९ मिनिटांच्या वेळी ११० गोल पूर्ण करत पोर्तुगीजशी बरोबरी साधली आणि इराणचे माजी स्ट्रायकर अली जेईच्या आंतरराष्टीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करत नवीन विक्रमाची नोंद केली आहे.

    रोनाल्डोने पुन्हा एकदा कमबॅक करत १८० व्या सामन्यात १११ गोलचा नवीन विक्रम करत आयर्लंडच्या प्रेक्षकांची बोलतीच बंद केली. तसेच पोर्तुगीजने सामन्यात २-१ शी बरोबरी साधत सामना खिशात टाकला. सामन्यानंतर रोनाल्डोने सांगितलं की, मी खूप आनंदीत आणि प्रफुल्लित आहे. नवीन विक्रमाची नोंद केल्यामुळे नव्हे तर त्या विशेष आठवणींसाठी ज्या आम्हाला मिळाल्या आहेत. सामनाच्या शेवटी दोन गोल करणे एवढे कठीण असते की…परंतु संघाने जे काही केलं त्याचं मला कौतुक आणि प्रशंसा करावी लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही विश्वास सोडून दिला नाही. असं रोनाल्डोने सांगितलं.

    रोनाल्डोच्या मते सामनाची सुरूवात एवढी खास नव्हती.आयर्लंडच्या गोवीन बजुनूने अवघ्या १५ व्या मिनिटांतच त्याची पेनल्टी कीक रोखली. २००४ मध्ये यूरोपीय चॅम्पियनशीपच्या पोर्तुगीजमध्ये रोनाल्डोने आपला पहिला गोल केला होता. हा सामना खिशात घातल्यानंतर पोर्तुगीजचा संघ चारही सामन्यांत १० अंकांसोबत पुढच्या दिशेची वाट धरत आहे.