kapil dev

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राहुल द्रविडला(Rahul Dravid) वरीष्ठ खेळाडूंच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक(Coach) म्हणून नेमल्याने त्याला मुख्य संघाचा प्रशिक्षक केलं जाऊ शकतं. अशा चर्चांनाही उधाण येऊ लागलं आहे.

    सध्या भारताचे खेळाडू कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. युवा खेळाडू असलेला संघ कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्त्वाखाली श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राहुल द्रविडला वरीष्ठ खेळाडूंच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमल्याने त्याला मुख्य संघाचा प्रशिक्षक केलं जाऊ शकतं. अशा चर्चांनाही उधाण येऊ लागलं आहे.

    दरम्यान रवी शास्त्री यांनी आयसीसी स्पर्धेची ट्रॉफी सोडल्यास इतर सर्व स्पर्धांमध्ये संघाला चांगलं यश मिळवून दिलं आहे. तेच समोर ठेवत भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी रवी शास्त्रींना कोच म्हणून कायम ठेवण्याबाबत एक विधान केलं आहे.

    कपिल देव म्हणाले, ”मला वाटत नाही सध्यातरी या मुद्द्यावर बोलणे गरजेचे आहे. श्रीलंका दौरा संपूदे. त्यानंतर संघाचा त्याठिकाणी जो काही परफॉर्मन्स असेल त्याच्या आधारावर आपण पुढील निर्णय घेऊ शकतो. आपण नवा प्रशिक्षक शोधत आहोत हे खरे असले तरी, रवी शास्त्री यांनी आपली कामगिरी योग्य पार पाडल्यास त्यांना बदलण्याची कोणतीच गरज मलातरी वाटतं नाही. नेमका काय निर्णय होईल हे येणारी वेळच सांगेल”

    सध्या टीम इंडिया एकावेळी इंग्लंड आणि श्रीलंका अशा दोन्ही देशांच्या दौऱ्यावर आहे. यात एक संघ शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर व्हाइट बॉल सीरीज खेळणार असून दुसरा संघ विराटच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळणार आहे. दरम्यान श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात अनेक नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली असून संघात युवा खेळाडूंचा भरण आहे. यावर बोलताना कपिल देव म्हणाले, ”संघात नव्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे हे पाहून आनंद वाटतो.”