भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचे निधन

एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेते बॉक्सर दिनको सिंह यांचे वयाच्या ४२व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. २०१७पासून त्यांच्यावर यकृताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते. 

    एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेते बॉक्सर दिनको सिंह यांचे वयाच्या ४२व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. २०१७पासून त्यांच्यावर यकृताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते.

    तब्येत बिघडल्यामुळे त्यांना गेल्या वर्षी मणिपूरहून विमानाने दिल्ली येथे आणण्यात आले होते. मात्र कावीळ झाल्यामुळे त्यांच्यावर कर्करोगावरील उपचार करता आले नाहीत. त्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णवाहिकेतून २४०० किमी लांब असलेल्या मणिपूरला नेण्यात आले.

    दिनको सिंह यांनी १९९८मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. १९९८मध्ये त्यांना अर्जुन आणि २०१३मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.