टीम इंडियातील चार खेळाडूंचं नशीब फुटकं, टी-२० वर्ल्ड कपमधून कापले तिकीट

टीम इंडियाचा वेगवान फलंदाज पृथ्वी शॉ, जो ऋषभ पंतसारखा स्फोटक फलंदाजी करण्यात माहिर आहे, त्याला निवडकर्त्यांनी टी -२० विश्वचषकासाठी पाहिले देखील नाही. टी -२० विश्वचषकाच्या संघात निवड समिती पृथ्वी शॉला सलामीवीर म्हणून संधी देऊ शकत होते.

    आयपीएल २०२१ (IPL 2021) चं दुसरं सत्र संपल्यानंतर टी-२० विश्वचषक (T-20 World Cup 2021) २०२१ ची सुरूवात १७ ऑक्टोबरपासून होणार आहे. तसेच हे सामने यूएईमध्ये (UAE) खेळवले जाणार आहे. आयसीसीच्या (ICC) या मेगा इव्हेंटमध्ये भारताला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. यावेळी निवडक समितीने (Selectors) टीम इंडियामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांची निवड केली आहे. परंतु टीम इंडियातील चार खेळाडूंचे नशीब फुटके ठरले आहे. म्हणजेच टी-२० वर्ल्डकपमधून त्यांचे तिकीट कापले गेले आहे.

    टीम इंडियाचा वेगवान फलंदाज पृथ्वी शॉ, जो ऋषभ पंतसारखा स्फोटक फलंदाजी करण्यात माहिर आहे, त्याला निवडकर्त्यांनी टी -२० विश्वचषकासाठी पाहिले देखील नाही. टी -२० विश्वचषकाच्या संघात निवड समिती पृथ्वी शॉला सलामीवीर म्हणून संधी देऊ शकत होते.

    आयपीएलमध्ये देवदत्त पडिकलने विराट कोहलीसह आरसीबी संघासाठी सलामी दिली. पडिक्कलच्या नावावर १ शतक आणि ६ अर्धशतके आहेत. त्याचा उत्कृष्ट विक्रम असूनही त्याच्याकडे जागतिक स्पर्धेतून दुर्लक्ष करण्यात आले. टी -२० विश्वचषकासाठी निवडकर्त्यांनी चेतन साकारियाला देखील सिलेक्ट केले नाही. चेतन साकारियाला टी -२० विश्वचषक संघात संधी दिली जाऊ शकते.

    दरम्यान, निवड समितीने मोहम्मद सिराजला देखील टी -२० विश्वचषक संघातून वगळले गेले आहे, जो टी -२० सीरिजमध्ये धोकादायक वेगवान गोलंदाज समजला जातो.