फ्रेंच ओपनला दुसरा धक्का! रॉजर फेडररनं घेतली स्पर्धेतून माघार ; स्पर्धेच्या आयोजकांनीही दिला दुजोरा

रॉजर फेडरर गेल्या दीड वर्षापासून गुडघ्याच्या दुखण्याचा सामना करत आहे. याच दरम्यान त्याच्या गुडघ्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया देखील झाली आहे. शनिवारी डोमिनिक कोएपफर विरुद्धच्या सामन्यात विजय प्राप्त केल्यानंतर रॉजर फेडररनं स्पर्धेत पुढे खेळण्याबाबत खूप संभ्रमात असल्याचं म्हटलं होतं. पुढील महिन्यात होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेची तयारी देखील करायची असल्याचं फेडररनं म्हटलं होतं.

    जागतिक महिला टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिनं फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता स्पर्धेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तब्बल २० वेळा ग्रँडस्लॅम विजेतीपदं नावावर असलेल्या रॉजर फेडररनंही फ्रेंच ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    स्पर्धेच्या आयोजकांनीही यास दुजोरा दिला आहे. शनिवारी रॉजर फेडरर स्पर्धेतील तिसरा सामना खेळताना फार थकलेला जाणवत होता. तसेच त्याच्या गुडघ्याच्या दुखणंही पुन्हा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं.