भारतात अडकलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंना मोठा दिलासा; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा

आयपीएल स्थगित केल्यावर सर्वांत जास्त समस्या या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना होत आहेत. कारण ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत भारताच्या  विमानांना आणि प्रवाशांसाठी प्रवेशबंदी केली आहे. त्याचबरोबर इंग्लंडनेही विमानांसाठी काही अटी घातलेल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू भारतात अडकून पडले आहेत.

    नवी दिल्ली: आयपीएलला स्थगिती दिल्यानंतर परदेशी क्रिकेटपटूंना सर्वात जास्त समस्या जाणवत आहेत. कारण काही खेळाडूंना त्यांच्या देशाने प्रवेश नाकारला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका सरकारने आपल्या खेळाडूंना मायदेशी नेण्यासाठी हालचाली सुरू केल्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.

    आयपीएल स्थगित केल्यावर सर्वांत जास्त समस्या या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना होत आहेत. कारण ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत भारताच्या  विमानांना आणि प्रवाशांसाठी प्रवेशबंदी केली आहे. त्याचबरोबर इंग्लंडनेही विमानांसाठी काही अटी घातलेल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू भारतात अडकून पडले आहेत.

    इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मोठा फटका बसत असला, तरी दक्षिण आफ्रिका हा देश आपल्या खेळाडूंसाठी पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहे.कारण आपल्या खेळाडूंना देशात प्रवेश देण्याची परवानगी त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर या खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.