आयपीएल २०२० आणि २०२१ मध्ये झालाय मोठा बदल, हरभजन सिंगने केला मोठा खुलासा…

हरभजन सिंगने मागील वर्षातील आयपील २०२० च्या सामन्यातून माघार घेतली होती. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि गंभीर परिस्थितीमुळे त्याने आय़पीएल २०२० मधून बाहेर उडी घेतली. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात अनेक बदल झाले असल्याचा खुलासा हरभजनने केला आहे.

    देशात कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा होताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बँध लावण्यात आले आहेत. कोविड-१९ ची दुसरी लाट देशातील विविध भागांत पसरण्याची शक्यता आहे. परंतु मागील वर्षापासून आतापर्यंत प्रचंड प्रमाणात काही गोष्टी बदलल्या आहेत. असं भारताचा अष्टपैलू हरभजन सिंग म्हणाला.

    हरभजन सिंगने मागील वर्षातील आयपील २०२० च्या सामन्यातून माघार घेतली होती. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि गंभीर परिस्थितीमुळे त्याने आय़पीएल २०२० मधून बाहेर उडी घेतली. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात अनेक बदल झाले असल्याचा खुलासा हरभजनने केला आहे.

    आयपीएल २०२० चे सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव सलामीवीर फलंदाज सुरैश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली. त्यानंतर हरभजनने सुद्धा माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्ज या संघातून भारताच्या दिग्गज खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला होता. कोरोना व्हायरसच्या भितीपोटी आणि कुटुंबियांच्या बाबतीत मी जरा चिंतेत होतो. त्यानंतर भारतात परतल्यानंतर सुद्धा क्वारंटाईन व्हाव लागलं होतं. परंतु यंदाच्या वर्षात आयपीएल २०२१ ही भारतातच होणार असल्यामुळे सामान्य परिस्थितीप्रमाणे दिसत आहे. दरम्यान, आता भारतात कोरोनावर मात करण्यासाठी औषध सुद्धा आलं आहे. त्यामुळे माझी पत्नी गीताने मला सांगितलं की, तुला जायला पाहीजे आणि खेळलं पाहीजे.