कुणीतरी येणार येणार गं…भज्जी दुसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीने सोशल मीडियावरून दिली गुडन्यूज

हरभजन सिंग व गीता बसरा यांना याआधी एक मुलगी असून तिचे नाव हिनाया हिर असे आहे. गीताने आज त्या तिघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात हिनायाच्या हातात एक टिशर्ट असून त्यावर मोठी बहिण असे लिहिलेले आहे. सोबत कमिंग सून जुलै २०२१ अशी छोटीशी पण सूचक कॅप्शन गीताने शेअर केली आहे.

    टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग व प्रसिद्ध अभिनेत्री गीता बसराने सोशल मीडियावरून गुडन्यूज दिली आहे. गीता ही प्रेग्नेंट असून त्यांनी सोशल मीडिया वरून एक फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. जुलै महिन्यात त्यांचे दुसरे बाळ जन्माला येणार आहे

    हरभजन सिंग व गीता बसरा यांना याआधी एक मुलगी असून तिचे नाव हिनाया हिर असे आहे. गीताने आज त्या तिघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात हिनायाच्या हातात एक टिशर्ट असून त्यावर मोठी बहिण असे लिहिलेले आहे. सोबत कमिंग सून जुलै २०२१ अशी छोटीशी पण सूचक कॅप्शन गीताने शेअर केली आहे.

    आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणारा अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग याचा संघासोबतचा करार संपला आहे. हरभजननं स्वत: ट्विट करत हा करार संपल्याचं जाहीर केलं होतं.