यामुळं हार्दीक पांड्या मॉरिसला नडला

मुंबई इंडियन्सच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यामध्ये हार्दीक पंड्या चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. बाद झाल्यावर हार्दीक आणि ख्रिस मॉरिस यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. हार्दीक आणि मॉरिस यांच्यामध्ये या सामन्यात चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली होती. या सामन्याच्या १५ व्या षटकात मॉरिसने हार्दीकला यॉर्कर आणि संथगतीने चेंडू टाकत चांगलेच हैराण केले होते. पण या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दीकने षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले. या दोघांमध्ये तेव्हापासूनच शाब्दिक युद्ध रंगायला सुरुवात झाली होती.

मॉरिस त्यानंतर १७व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकात पुन्हा मॉरिस आणि पंड्या आमने-सामने आले होते. या षटकात मॉरिसने बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. कारण या षटकात पांड्याला फटकेबाजी करता आली नाही. पण त्यानंतर १९व्या षटकात हे दोघे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या षटकातील चौथ्या चेंडूवर पांड्याने मॉरिसच्या गोलंदाजीवर चौकार वसूल केला. पण यानंतरच्या चेंडूवर मॉरिसने मोहम्मद सिराजकरवी पंड्याला झेलबाद केले. बाद झाल्यावर तो मॉरिसच्या जवळ गेला आणि काही तरी पुटपुटला. त्यानंत मॉरिसनेही त्याला उत्तर दिले. त्यानंतर मैदान सोडताना पंड्या मॉरिसला हाताना इशारा करत असल्याचे पाहायला मिळाले.

…तर कारवाई होणार

या गोष्टीनंतर सामनाधिकारी पांड्या आणि मॉरिस यांच्यावर नाराज झाले. सामनाधिकाऱ्यांनी या दोघांनाही ताकीद दिली. पांड्या आणि मॉरिस हे दोघेही नियम न पाळल्यामुळे दोषी आढळले आहेत. या दोघांकडून पहिल्यांदाच ही चूक झाली,  त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यापुढे जर या दोघांकडून कोणतीही चूक घडली तर त्यांच्यावर आयपीएलच्या नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येऊ शकते.