सळो की पळोची स्थिती! SRHच्या गोलंदाजांसमोर राजस्थानच्या फलंदाजाचा भेदक मारा ; ११ चौकार व ८ षटकार ठोकले

बटलरनं आयपीएलमध्ये पहिल्या शतकाची नोंद करताना कर्णधार संजू सॅमसनसह दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. इंग्लंडच्या खेळाडूची आयपीएलमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.

    सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला आज राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) जॉस बटलरनं ( Jos Buttler) धु धु धुतले. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली यंदाच्या पर्वातील या पहिल्याच सामन्यात SRHच्या डावपेचातही बदल पाहायला मिळाले.

    बटलरनं आयपीएलमध्ये पहिल्या शतकाची नोंद करताना कर्णधार संजू सॅमसनसह दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. इंग्लंडच्या खेळाडूची आयपीएलमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.

    विलियम्सननं सुरूवातीच्या षटकांत आदिल राशिदला गोलंदाजीसाठी आणले आणि त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला ( १२) पायचीत केलं. त्यानंतर आलेल्या कर्णधार संजू सॅमसन व जॉस बटलर या जोडीनं SRHला रडवले. सॅमसन व बटलर जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.