Mumbai Indians मध्ये हिटमॅन रोहित शर्माने केलं कमबॅक, सर्व खेळाडूंनी केलं जंगी स्वागत

रोहित शर्माने इंग्लंडच्या विरूद्ध टेस्ट सीरीज खेळल्यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या सत्रामध्ये पोहोचला आहे. रोहित यूएईमध्ये पोहोचला असून मुंबईच्या टीमकडून त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. MI चे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धने, जहीर खान, हार्दिक पांड्या, धवल कुलकर्णी आणि ट्रेंट बोल्ट यांसारख्या खेळाडूंनी आपल्या कॅप्टनकूलचं जोरदार आणि शानदार स्वागत केलं आहे.

  आयपीएल २०२१ (IPL 2021) चं दुसरं सत्र उद्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मुंबई आणि चेन्नई (MI Vs CSK) यांच्यामध्ये उद्या पहिला सामना होणार असून दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. अशातच भारतीय संघाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) आपलं क्वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर टीममध्ये कमबॅक केलं आहे. तसेच मुंबईच्या सर्व खेळाडूंनी त्यांचं जंगी स्वागत केलं आहे.

  रोहित शर्माने इंग्लंडच्या विरूद्ध टेस्ट सीरीज खेळल्यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या सत्रामध्ये पोहोचला आहे. रोहित यूएईमध्ये पोहोचला असून मुंबईच्या टीमकडून त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. MI चे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धने, जहीर खान, हार्दिक पांड्या, धवल कुलकर्णी आणि ट्रेंट बोल्ट यांसारख्या खेळाडूंनी आपल्या कॅप्टनकूलचं जोरदार आणि शानदार स्वागत केलं आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

  दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघाने कॅप्टनचं स्वागत केल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित सर्व खेळाडूंना भेटताना दिसत आहे. रोहित शर्मा यावेळी सुद्धा चांगलं प्रदर्शन करणार आहे. कारण संघामध्ये सर्वात जास्त यशस्वी कर्णधार म्हणून रोहितकडे पाहिलं जात. आतापर्यंत ५ ट्रॉफ्या रोहितने मुंबईला जिंकवून दिल्या आहेत. तसेच यंदाच्या हंगामात पण रोहितचं लक्ष हे आयपीएलच्या २०२१ च्या ट्रॉफीकडे असणार आहे.