पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर हिटमॅन रोहित शर्मा म्हणतो, “काहीतरी चुकतंय”

पंजाब किंग्सनसं ( Punjab Kings) ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला अन् गुणतक्त्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. क्षेत्ररक्षणातल्या चुकाही मुंबई इंडियन्सला महागात पडल्या. जसप्रीत बुमराह व राहुल चहर यांनी हातचा चौकार दिला. १८ चेंडूंत १७ धावांची गरज असताना गेलनं १८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ट्रेंट बोल्टचे स्वागत केले. त्यांतनंतर लोकेशनं ६,४ मारून विजयावर शिक्कामोर्तब केले.

    मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.  मुंबई इंडियन्सनं ६ बाद १३१ धावाच केल्या आणि पंजाबनं १७.४ षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. पंजाब किंग्सनं १७.४ षटकांत १ बाद १३२ धावा करून विजय मिळवला. लोकेश राहुल ५२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ६० धावांवर, तर गेल ३५ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर नाबाद राहिला.

    पंजाब किंग्सनसं ( Punjab Kings) ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला अन् गुणतक्त्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. क्षेत्ररक्षणातल्या चुकाही मुंबई इंडियन्सला महागात पडल्या. जसप्रीत बुमराह व राहुल चहर यांनी हातचा चौकार दिला. १८ चेंडूंत १७ धावांची गरज असताना गेलनं १८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ट्रेंट बोल्टचे स्वागत केले. त्यांतनंतर लोकेशनं ६,४ मारून विजयावर शिक्कामोर्तब केले.

    या सामन्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

    पुरेशी धावसंख्या उभारू शकलो नाही, हेच सत्य आहे. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी खराब अजिबात नव्हती. पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी खेळ करून ते सिद्ध केले. आम्ही १५०-१६० धावा उभ्या करू शकलो असतो तर सामन्याचा निकाल वेगळा असता. मागील दोन सामन्यांत आम्हाला अपयश येत आहे, या समस्येवर लक्ष घालायला हवं,असे रोहित म्हणाला.