मॅचसाठी काहीपण! कसोटी सामन्यासाठी हिटमॅन रोहित शर्मा एनसीएमध्ये करतोय कसरत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल…

रोहित शर्माची (Rohit Sharma) ११ डिसेंबरला फिटनेस टेस्ट (Fitness Test) होणार आहे. ही फिटनेस टेस्ट पास झाली तरच रोहित शर्मा कसोटी सामन्यात (Test Series) जाऊ शकतो. परंतु तिकडे गेल्यानंतर त्याला १४ दिवस क्वारंटाईन (Quarantine) व्हावं लागणार आहे. त्यामुळे तो सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्याला मुकणार आहे.

बंगळुरू : भारतीय संघाचा ओपनर आणि हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये (NCA of Bangalore) उपचार घेत आहे. रोहित शर्माची ११ डिसेंबरला फिटनेस टेस्ट (Fitness Test) होणार आहे. ही फिटनेस टेस्ट पास झाली तरच रोहित शर्मा कसोटी सामन्यात (Test Series) जाऊ शकतो. परंतु तिकडे गेल्यानंतर त्याला १४ दिवस क्वारंटाईन (Quarantine) व्हावं लागणार आहे. त्यामुळे तो सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्याला मुकणार आहे.

रोहित शर्मा सध्या एनसीएमध्ये अधिक मेहनत करत आहे. मांडीच्या दुखापतीवर उपचार घेत असतानाच रोहित वजन कमी करण्यासाठीही घाम गाळत आहे. रविवारी रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेयर केले. या फोटोमध्ये रोहित आयपीएलच्या तुलनते बारिक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

आयपीएल (IPL 2020)दरम्यान रोहित शर्माच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला एकदिवसीय सामना आणि टी-२० टीममधून वगळण्यात आलं होतं. परंतु आता रोहित शर्मा कसोटी सामन्यात आपली झलक दाखवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.