हाँगकाँगच्या नगन यी चेंगला हरवत पी. व्ही. सिंधूची उपउपांत्य फेरीत धडक

आक्रमक खेळी करत हाँगकाँगच्या नगन यी चेंग हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीतएकतर्फी वर्चस्व राखले. सिंधूने पहिला गेम २१-९ असा आरामात जिंकत सामन्यात आघाडी घेतली

    टोकियोऑलम्पिकमध्ये पदकाची दावेदार असलेली भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (PV Sindhu) हिने ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. आज झालेल्या महिला एकेरीमध्ये लढतीत सिंधूने हाँगकाँगच्या नगन यी चेंगवर सरळ गेममध्ये मात केली. सिंधूने हा सामना २१-९, २१-१६ असा जिंकला.


    सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत हाँगकाँगच्या नगन यी चेंग हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीतएकतर्फी वर्चस्व राखले. सिंधूने पहिला गेम २१-९ असा आरामात जिंकत सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये हाँगकाँगच्या खेळाडूने सिंधूला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा गेमही सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकला व अवघ्या २८ मिनिटांमध्ये सामना खिशात घातला