हैदराबादचा पंजाबवर ६९ रन्सने मोठा विजय, रशिदने उडवली पंजाबची दांडी

आयपीएल 2020 (IPL 2020) च्या हंगामातील २२वा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात झाला. या सामन्यामध्ये हैदराबादने पंबाजचा ६९ रन्सने पराभव केला आहे.

आयपीएल 2020 (IPL 2020) च्या हंगामातील २२वा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात झाला. या सामन्यामध्ये हैदराबादने पंबाजचा ६९ रन्सने पराभव केला आहे. सनरायजर्स हैदराबादने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेली किंग्स इलेव्हन पंजाबची टीम १३२ रन्स करुन ऑल आऊट झाली.

सनरायजर्स हैदराबादकडून जॉनी बेयरस्टोने ९७ रन्सची तुफानी खेळी केली. डेविड वॉर्नरने आज ५२ रन्स केले. वॉर्नर आणि बेयरस्टोने पहिल्या विकेटसाठी १६० रन्सची पार्टनरशिप केली. केन विलियमसनने २० रन्स केले. हैदराबादच्या टीमने प्रथम बॅटिंग करत २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स गमावत २०१ रन्स केल्या आणि किंग्स इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी २०२ रन्सचं आव्हान उभं केलं.

मैदानात उतरलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबची सुरुवात खराब झाली. मयांक अग्रवाल हा केवळ ९ रन्स करुन रन आऊट झाला. त्यानंतर केएल राहुल हा ११ रन्स करुन आणि सिमरन सिंग ११ रन्स करुन माघारी परतले. तसेच हैदराबाद संघाकडून फिरकीपटू रशिदने पंजाबची दांडी उडवत ४ विकेट्स घेतल्या.

या विजयामुळे सनरायजर्स हैदराबादची टीम आयपीएल २०२० च्या पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाली आहे. सनरायजर्स हैदराबादने आतापर्यंत सहा मॅचेस खेळल्या असून त्यापैकी तीन मॅचेसमध्ये विजय मिळवत आपल्या खात्यात सहा पॉईंट्स जमा केले आहेत.