पंजाबच्या फलंदाजांचा गोंधळ पाहून आवरणार नाही हसू, PHOTO व्हायरल…

 सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलनं खणखणीत षटकार मारून रबाडाचं स्वागत केलं. पण, पुढच्याच चेंडूवर रबाडानं त्याला चालतं केलं. रबाडानं १४४च्या वेगान टाकलेल्या फुलटॉस चेंडू गेलला खेळताच आला नाही अन् त्याचे दोन त्रिफळे उडाले.

    लोकेश राहुलच्या ( KL Rahul) अनुपस्थितीत पंजाब किंग्स संघ ( Punjab Kings) आज आयपीएल २०२१त दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) सामना करत आहे. पण, पंजाब किंग्सचे फलंदाज गोंधळलेल्या अवस्थेत दिसले.

    सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलनं खणखणीत षटकार मारून रबाडाचं स्वागत केलं. पण, पुढच्याच चेंडूवर रबाडानं त्याला चालतं केलं. रबाडानं १४४च्या वेगान टाकलेल्या फुलटॉस चेंडू गेलला खेळताच आला नाही अन् त्याचे दोन त्रिफळे उडाले.

    पदार्पण करणाऱ्या डेवीड मलाननं आज कर्णधार मयांकसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना पंजाबचा डाव सावरला. पण, दिल्लीच्या गोलंदाजांना पंजाबच्या धावगतीला वेसण घातले होते. १४व्या षटकात विचित्र प्रकार पाहायला मिळाला.