आयसीसीकडून २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुपची मोठी घोषणा, तब्बल ५ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान भिडणार आमनेसामने

भारतीय संघ गट २ मध्ये असून याच गटात पाकिस्तानचाही समावेश आहे. त्यामुळे चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. गट २ मध्ये भारत, पाकिस्तानसह न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे. तसेच पात्रता फेरीतील दोन संघ या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

    आयसीसीकडून २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुपची मोठी घोषणा करण्यात आली आहे. तब्बल ५ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. तसेच हे दोन्ही संघ एकाच ग्रूप मध्ये असणार आहेत. 2021 T-20 विश्वाचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी असलेलं भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार महामुकाबला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघातील हा सामना म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच असणार आहे.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी टी-२० वर्ल्डकपचे गट जाहीर केले आहेत. सुरुवातीला पात्रता फेरी होणार असून यात आठ संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. त्यानंतर मुख्य स्पर्धेत एकूण १२ संघांचा दोन गटांमध्ये समावेश असणार आहे.

    भारतीय संघ गट २ मध्ये असून याच गटात पाकिस्तानचाही समावेश आहे. त्यामुळे चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. गट २ मध्ये भारत, पाकिस्तानसह न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे. तसेच पात्रता फेरीतील दोन संघ या गटात समाविष्ट केले जाणार आहेत. तसेच गट १ मध्ये एकदिवसीय वर्ल्डकपच्या गतविजेत्या इंग्लंडचा आणि टी-२० वर्ल्डकपच्या गतविजेत्या वेस्ट इंडिजचा समावेश आहे. या दोन्ही संघांना यंदाचा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे