ICC announces 2021 T20 World Cup group nrms | आयसीसीकडून २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुपची मोठी घोषणा, भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार काँटे की टक्कर | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
क्रीडा
Published: Jul 17, 2021 08:31 AM

#T20WorldCup 2021आयसीसीकडून २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुपची मोठी घोषणा, भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार काँटे की टक्कर

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
आयसीसीकडून २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुपची मोठी घोषणा, भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार काँटे की टक्कर

भारतीय संघ गट २ मध्ये असून याच गटात पाकिस्तानचाही समावेश आहे. त्यामुळे चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. गट २ मध्ये भारत, पाकिस्तानसह न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे. तसेच पात्रता फेरीतील दोन संघ या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

    आयसीसीकडून २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुपची मोठी घोषणा करण्यात आली आहे. तब्बल ५ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. तसेच हे दोन्ही संघ एकाच ग्रूप मध्ये असणार आहेत. 2021 T-20 विश्वाचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी असलेलं भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार महामुकाबला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघातील हा सामना म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच असणार आहे.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी टी-२० वर्ल्डकपचे गट जाहीर केले आहेत. सुरुवातीला पात्रता फेरी होणार असून यात आठ संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. त्यानंतर मुख्य स्पर्धेत एकूण १२ संघांचा दोन गटांमध्ये समावेश असणार आहे.

    भारतीय संघ गट २ मध्ये असून याच गटात पाकिस्तानचाही समावेश आहे. त्यामुळे चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. गट २ मध्ये भारत, पाकिस्तानसह न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे. तसेच पात्रता फेरीतील दोन संघ या गटात समाविष्ट केले जाणार आहेत. तसेच गट १ मध्ये एकदिवसीय वर्ल्डकपच्या गतविजेत्या इंग्लंडचा आणि टी-२० वर्ल्डकपच्या गतविजेत्या वेस्ट इंडिजचा समावेश आहे. या दोन्ही संघांना यंदाचा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

    Comments
    Advertisement
    Advertisement
    दिनदर्शिका
    २५ रविवार
    रविवार, जुलै २५, २०२१

    एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...
    Advertisement
    Advertisement
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.