महिला क्रिकेटपटूंची ICC Rankings जाहीर, मिथाली पहिल्या स्थानावर कायम

मिथाली पाठोपाठ ऑस्ट्रेलियाची एलिसा तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर भारताची आणखी एक फलंदाज टॉप 10 मध्ये असून तिचं नाव स्म्रिती मंधाना असं आहे. नवव्या स्थानावर असणारी स्म्रिती7o1 गुण मिळवण्यात यशस्वी झाली आहे.

    भारताची दिग्गज क्रिकेटपटू मिथाली राजने (Mithali Raj) आयसीसीच्या नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक रँकिंगमध्ये (ICC Ranking) पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेची स्टार फलंदाज लिजेल ली (Lizelle Lee) ही देखील पहिल्या स्थानावर विराजमान आहे. दोघीही 762 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत.

    मिथाली पाठोपाठ ऑस्ट्रेलियाची एलिसा तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर भारताची आणखी एक फलंदाज टॉप 10 मध्ये असून तिचं नाव स्म्रिती मंधाना असं आहे. नवव्या स्थानावर असणारी स्म्रिती7o1 गुण मिळवण्यात यशस्वी झाली आहे.

    एकदिवसीय प्रकारानंतर टी-20 मध्ये भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मा अव्वल क्रमांकावर आहे. तिच्या खात्यात 759 गुण आहेत. तर एकदिवसीय रँकिगमध्ये नवव्या स्थानावर असणारी स्म्रिती टी-20 मध्ये 716 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.