आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चे वेळापत्रक जाहीर, पहा कधी होणार भारतीय संघाचा पहिला सामना?

महिला विश्वचषक स्पर्धेचे २०२२ वेळापत्रक जाहीर (ICC Women's World Cup 2022 schedule announced) करण्यात आले आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. हे सामने न्यूझिलंडमध्ये होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी महिला विश्वचषक स्पर्धेचे २०२२ वेळापत्रक जाहीर (ICC Women’s World Cup 2022 schedule announced) करण्यात आले आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. हे सामने न्यूझिलंडमध्ये होणार आहेत. ३१ दिवस ३१ सामने खेळले जाणार असून ४ मार्च २०२२ ते ३ एप्रिल २०२२ मध्ये हे सामने होणार आहेत. हे सामने न्यूझिलंडमध्ये Auckland, Tauranga, Hamilton, Wellington, Christchurch, आणि Dunedin या ६ शहरांमध्ये हे सामने होणार आहेत.

भारतीय महिला संघाचा पहिला सामना ६ मार्चला होणार आहे. पण तो नेमका कोणाशी असेल याची माहिती क्वालिफायर नंतर समजणार आहे. आयसीसी महिला विश्वचषक २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये खेळला गेला होता आणि लॉर्ड्स येथे भारताविरुद्ध नऊ धावांनी पराभूत करून यजमान विजयी झाला होता. यावेळी इंग्लंड ५ मार्च रोजी हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे बहु-वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपली मोहीम उघडवली आहे.

महिला क्रिकेट विश्वकपाचा हा ११ वा कार्यक्रम आहे. सध्या भारता प्रमाणेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्युझिलंड, दक्षिण आफ्रिका या टीम विश्वचषकासाठी क्वालिफाय झाल्या आहेत. अन्य ३ टीम्सचा निर्णय श्रीलंकामध्ये पुढील वर्षी जून-जुलैमध्ये होणार्‍या क्वालिफाईंग टूर्नामेंटमध्ये होणार आहे.