‘बीसीसीआय’ची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक ; ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा अंतिम निर्णय होणार

दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक ठरवण्यासाठी तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांची मुंबईत या आठवडय़ात बैठक होणार आहे.

    मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक ठरवण्यासाठी तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांची मुंबईत या आठवडय़ात बैठक होणार आहे.

    सद्यपरिस्थितीचा आढावा घेत ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी पोषक वातावरण आहे की नाही, यावरही चर्चा केली जाणार आहे. ‘आयसीसी’ने विश्वचषकाच्या आयोजनाविषयीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ला २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे.

    या बैठकीत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा ठरवण्याविषयी तसेच परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेविषयी चर्चा करण्यात येईल.