यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट आली समोरeng

आयपीएल स्पर्धा सुरु असताना बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. आता इंग्लंड दौऱ्यातही दोन भारतीय क्रिकेटपटूंना कोरोना झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात आणि फॅन्समध्ये चिंतेंचं वातावरण आहे.

    मुंबई: येत्या ४ ऑगस्टपासून इंग्लंड – भारत कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. त्यासाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. अशातच भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत यास करोना झाल्याची बातमी समोर आली आहे. परंतु रिषभची तब्येतीत सुधारणा होत असून जलद वेगाने रिकव्हर होत असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे.

    कसोटी सामन्यापूर्वी २० दिवसांच्या सुट्टीत रिषभ पंत यूरो चषक फुटबॉल स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी गेला होता अन् तेथे तो मास्क व सोशल डिस्टन्सिंग या नियमांचं पालन करताना दिसला नव्हता. त्यामुळेच त्याचा करोना झाल्याचे समोर येत आहे.

    आयपीएल स्पर्धा सुरु असताना बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. आता इंग्लंड दौऱ्यातही दोन भारतीय क्रिकेटपटूंना कोरोना झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात आणि फॅन्समध्ये चिंतेंचं वातावरण आहे. अशातच रिषभची तब्येत अगदी व्यवस्थेत आहे. त्याच्या तब्येतीची काहीही चिंता करण्याचं कारण नाही. तो वेगाने रिकव्हर होत असल्याची माहिती सौरव गांगुलीने दिली आहे.