चौथ्या टी-२० सामन्यात सॉफ्ट सिग्नल निर्णयावर भडकला विराट कोहली, म्हणाला…

चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यातील सॉफ्ट सिग्नल निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना सॉफ्ट सिग्नल निर्णयानुसार बाद दिले. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

    टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने काल (गुरूवार) इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यातील सॉफ्ट सिग्नल निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना सॉफ्ट सिग्नल निर्णयानुसार बाद दिले. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

    काय म्हणाला विराट कोहली?

    कसोटी मालिकेतही असंच झालं होतं, जेव्हा अजिंक्य रहाणेच्या नजीक मी उभा होतो आणि त्यानं झेल पकडला होता, परंतु अजिंक्यला खात्री नव्हती. त्यानंतर निर्णय तिसऱ्या पंचाकडे गेला. जेव्हा क्षेत्ररक्षकालाच खात्री नसते तेव्हा स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या अम्पायरला कसं स्पष्ट दिसू शकते? त्यामुळेच सॉफ्ट सिग्नल फार महत्त्वाचे असते आणि तेव्हा या निर्णयातील त्रुटी समोर येतात. मला हे समजत नाही की अम्पायरकडे हा पर्याय का नसतो. अशा निर्णयानं सामन्याचा निकालही बदलू शकतो. असं विराट कोहली म्हणाला.