आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराटला मागे टाकत रोहित शर्माने पटकावले पाचवे स्थान, तर रूट अव्वलस्थानी

रोहितने नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकत पाचवे स्थान पटकावले आहे. तर तीन कसोटीत सलग तीन शतके ठोकणारा इंग्लंडचा कर्णधार जो रुटने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

    आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराटला मागे टाकत रोहित शर्माने पाचवे स्थान पटकावले आहे. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची मालिका खेळत आहे. यात रोहित शर्माने चांगली फलंदाजी करत सर्वांचेच लक्ष वेधले.

    रोहितने नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकत पाचवे स्थान पटकावले आहे. तर तीन कसोटीत सलग तीन शतके ठोकणारा इंग्लंडचा कर्णधार जो रुटने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

    ५० डाव उलटून गेले तरी विराटच्या बॅटमधून अजूनपर्यंत शतक आलेले नाही. या त्याच्या सुमार फलंदाजीचा परिणाम त्याच्या टेस्ट रँकिंगवरही झाला असून तो पहिल्या पाचमधील यादीतून बाहेर फेकला गेला आहे.