तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दारूण पराभव, इंग्लंडची मालिकेत १-१ अशी बरोबरी

टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित ८ विकेट्स गमावल्या. अखेर टीम इंडियाचा डाव २७८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात टीम इंडियावर एक डाव आणि ७६धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

    टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्या डावात टीम इंडियाने ७८ धावांपर्यंतच मजल मारली होती. परंतु इंग्लंडने उत्कृष्ट फलंदाजी करत टीम इंडियाशी आगेकूच केली आणि पहिल्या डावात ४३२ धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु चौथ्या दिवशी टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली.

    कालच्या २ बाद २१५ वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित ८ विकेट्स गमावल्या. अखेर टीम इंडियाचा डाव २७८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात टीम इंडियावर एक डाव आणि ७६धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

    इंग्लंडचा गोलंदाज राॅबिन्सनने दुसऱ्या डावात धारदार गोलंदाजी करत टीम इंडियाच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही. त्याने दुसऱ्या डावात ५ गडी बाद केले. तर पहिल्या डावात देखील त्यानं २ गडी बाद करत भारताचा मध्यक्रम मोडीस काढला. इंग्लंडच्या या विजयात कर्णधार जो रूट आणि राॅबिन्सनचा मोठा वाटा आहे.