आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बीसीसीआयची लगबग सुरू, कोणत्या राज्यात खेळवला जाणार सामने?

आयपीएलचे १३ (IPL 13) वे हंगाम संपल्यानंतर त्याला दोन महिने पूर्ण झाले आहेत. आता १४ व्या (IPL 14) हंगामासाठी बीसीसीआयची (BCCI) लगबग सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु काही राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी देखील झाला आहे. कोरोनामुळे क्रिकेट (Cricket)  विश्वाला जोरदार फटका बसला आहे. आयपीएलचे १३ (IPL 13) वे हंगाम संपल्यानंतर त्याला दोन महिने पूर्ण झाले आहेत. आता १४ व्या (IPL 14) हंगामासाठी बीसीसीआयची (BCCI) लगबग सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगातील ही सर्वात श्रीमंत क्रिकेट स्पर्धा १० एप्रिलच्या आधी सुरू होऊ शकते. आयपीएलच्या १४व्या हंगामाबद्दल अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाहीये. परंतु १० एप्रिलच्या आधी ही स्पर्धा सुरू होऊ शकते. कारण इंग्लंडचा भारत दौरा २८ मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर आयपीएल २०२१ चे आयोजन होऊ शकते.

बीसीसीआयने काल गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी, पाच टी-२० आणि तीन वनडे मालिकेची घोषणा केली आहे. दरम्यान, आयपीएलचा १४वा हंगाम भारतातच घेणार आहे. त्यामुळे हे सामने महाराष्ट्र राज्यात खेळवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रात झाले तर कोणत्या ठिकाणी होणार सामने

आयपीएलचे १४ वे हंगाम महाराष्ट्रात झाले तर, मुंबईत दोन आंतररष्ट्रीय मैदान (वानखेडे आणि ब्रेबोर्न) आहेत. त्याचबरोबर पुणे आणि नागपूरमध्ये देखील आंतरराष्ट्रीय मैदान आहे. या शिवाय नवी मुंबईत देखील क्रिकेट मैदान आहे.