r ashwin

आता कोरोनाचे संकट क्रिकेटर्सवरही घोंगावू लागल्याने आयपीएल सिरीजमधून(corona effect on IPL) माघारीचा निर्णय काही बड्या क्रिकेटर्सनी(many big cricketers leaving IPL) घेतला आहे.

  मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सारा देश होरपळला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण संक्रमित(corona spread) होत आहेत. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये लॉकडाऊनसारखी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. याही परिस्थितीत आयपीएल २०२१ च्या मॅचेसमध्ये मात्र खंड पडलेला नाही. मात्र आता कोरोनाचे संकट क्रिकेटर्सवरही घोंगावू लागल्याने या सिरीजमधून माघारीचा निर्णय काही बड्या क्रिकेटर्सनी घेतला आहे.

  दिल्ली कॅपिटल्सचा स्टार ऑफ द स्पीनर अशी ओळख असणाऱ्या आर अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा फास्ट बॉलर ॲन्ड्र्यू टाई या दोघांनीही रविवारी माघारीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुच्या एडम जम्पा आणि केन रिचर्डसन यांनी स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतेला आहे.

  क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने (CA) या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. भारतात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने क्रिकेटर्सनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

  यापूर्वी राजस्थान टीमच्या लियाम लिविंगस्टोन यानेही बायो बबलमुळे येणाऱ्या थकव्यामुळे सिरीज सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो मायदेशी इंग्लंडला रवाही झाला आहे.

  आर अश्विनने माघारीची बातमी दिली सोशल मीडियावर
  हैदराबादविरद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच्या टीमने विजय मिळवला. त्यानंर आर अश्विनने सिझन सोडण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. अश्विनने लिहिले आहे ‘ माझे कुटुंबीय आणि इतर नातेवाईक सधअया कोरोनाचा सामना करीत आहेत. या कठीस परिस्थितीत मी त्यांच्या सोबत राहू इच्छितो. जर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली, तर मी पुन्हा खेळण्यासाठी परतेन’.

  क्रिकेटर्समध्ये सध्या कोरोनाची चर्चा
  ग्राऊंडवर होणाऱ्या कामगिरीपेक्षा सध्या सर्व प्लेअर्समध्ये बाहेर काय सुरु याहे, याचीच चर्चा जास्त होत असल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्स टीमचे कोच रिकी पाँटिंग यांनी दिली आहे. मात्र सद्यस्थितीत हे खेळाडूच देशात सर्वात सुरक्षित असल्याचेही रिकी यांचे म्हणणे आहे. सध्याच्या परिस्थितीत प्लेअर्स प्रवास करु इच्छित नसल्याचे चार फ्रेंचाईजींनीही सांगितले आहे. मात्र हा सिझन रद्द करावा, अशी कोणतीही मागणी अद्याप करण्यात आलेली नाही.