कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्टेडियममधून प्रेक्षक पुन्हा ‘आऊट’, गुजरात क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात करोनाचा प्रसार वाढला आहे. गुजरातमध्येही कोरोनानं डोकं वर काढलं असून, त्याचा फटका भारत आणि इंग्लंड यांच्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. राज्यात दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येचं गांभीर्य लक्षात घेत गुजरात क्रिकेट मंडळाने भारत-इंग्लंड यांच्यातील उर्वरित टी-२० सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

    अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून, तीन सामने होणार आहेत. मात्र, गुजरातमध्येही करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंतेत भर घातली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाचा फटका भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. यापुढील तिन्ही सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार असल्याचा मोठा निर्णय गुजरात असोसिएशनने घेतला आहे.

    महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात करोनाचा प्रसार वाढला आहे. गुजरातमध्येही कोरोनानं डोकं वर काढलं असून, त्याचा फटका भारत आणि इंग्लंड यांच्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. राज्यात दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येचं गांभीर्य लक्षात घेत गुजरात क्रिकेट मंडळाने भारत-इंग्लंड यांच्यातील उर्वरित टी-२० सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

    भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. यामध्ये १६ मार्च, १८ मार्च आणि २० मार्च रोजी उर्वरित तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.