प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

या स्टेडियमची उभारणी दोन फेजमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या फेजमध्ये 45 हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारले जाईल. त्यानंतर त्याची क्षमता 30 हजारने वाढवण्यात येणार आहे. एकूण या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 75 हजार इतकी असणार आहे.

    जयपूर : जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार करण्याची तयारी भारतामध्ये सुरू झाली आहे. हे स्टेडियम राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये उभारले जाणार आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख वैभव गहलोत यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जयपुरमध्ये स्टेडियम उभारण्याची घोषणा केली होती.

    या स्टेडियमची उभारणी दोन फेजमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या फेजमध्ये 45 हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारले जाईल. त्यानंतर त्याची क्षमता 30 हजारने वाढवण्यात येणार आहे. एकूण या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 75 हजार इतकी असणार आहे.

    जगातील सर्वात मोठे स्टेडियम हे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे. त्याची प्रेक्षक क्षमता 1.10 लाख इतकी आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया मेलबर्नचे ग्राउंड असून याची प्रेक्षक क्षमता एक लाख इतकी आहे.