वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गोलंदाजांमध्ये ‘या’ भारतीय खेळाडूने पटकावलं अव्वल स्थान ; ऑस्ट्रेलियन आणि इंग्लडंच्या गोलंदाजांनाही टाकलं मागे

टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनने आतापर्यंत एकूण ७१ विकेट्स घेतल्या असून त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या टॉप-५ मधून पहिलं स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने एकूण १४ कसोटी सामन्यांमध्ये ७० गडी बाद केले असून त्याने दुसरे स्थान पटकावले आहे. तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने १७ कसोेटी सामन्यांमधून ६९ विकेट्स पटकावले आहेत. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउथी आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिऑन या दोघांनी या सुद्धा ५७ विकेट्स घेत चौथं स्थान पटकावलं आहे.

    मुंबई : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. यामध्ये न्यूझीलंड संघाने ८ विकेट्सने टीम इंडियाचा पराभव केला आहे. परंतु वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यानंतर आता सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये टॉप ५ गोलंदाजांची नावे समोर आली आहे. एक आनंददायक गोेष्ट म्हणजे टीम इंडियाने जरी हा सामना हरला असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गोलंदाजांमध्ये टीम इंडियाचा फिरकीपटू आर. रविचंद्रन अश्विन याने अव्वल स्थान पटकावलं आहे.

    पहिल्या डावात अश्विनने दोन विकेट्स २८ धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या डावात सुद्दा २ जणांची दांडी गुल केली असून फक्त १७ धावा काढून दिल्या होत्या. न्यूझीलंडनं केन विल्यमसनच्या नेतृत्वात टीम इंडियाला आठ विकेट्सने हरवून प्रथम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जिंकला आहे. अश्विनने चार ते पाच विकट घेत सामन्याचा अंत केला आहे. तसेच त्याने शतक केलं असून एकूण ३२४ धावा ठोकल्या आहेत.

    २०१९ ते २०२१ यामधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वात जास्त विकेट्स पटकावणाऱ्या पहिल्या टॉप-५ गोलंदाजांची नावे जाहीर