shardul and siraj

 ब्रिस्बेन(brisbain) कसोटी सामन्यामधील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने(australia) २९४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांची आवश्यकता आहे.

ब्रिस्बेन(brisbain) कसोटी सामन्यामधील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने(australia) २९४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांची आवश्यकता आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियानं तर तुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. तिसरा कसोटी सामना भारतीय संघान अनिर्णीत राखला होता. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं जास्त धावा काढल्या आहेत.ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. वॉर्नर-हॅरिस यांनी पहिल्या  ८९ धावांची भागिदारी केली.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव स्मिथनं ५५ धावा काढल्या.तसेच डेव्हिड वॉर्नर (४८), हॅरिस (३८), लाबुशेन (२५), कॅमरुन ग्रीन(३७) आणि कर्णधार पेन (२७) यांनी झटपट धावा केल्या आहेत.

भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरनं प्रभावी गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजनं पाच बळी मिळवले तर शार्दुल ठाकूरनं ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांन तंबूत धाडलं. अष्टपैलू संदुरला एक बळी मिळाला.