India-Sri Lanka ODI; Wearing PPE kit masks and gloves, he took to the field for practice

इंग्लंड दौऱ्याहून परतल्यानंतर श्रीलंकेचा बॅटिंग कोच ग्रॅण्ट फ्लॉवर आणि डेटा ऍनलिस्ट जीटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाली. आता श्रीलंकेचे प्रशिक्षक कोरोनाच्या धोक्यापासून बचावासाठी पीपीई किट मास्क आणि ग्लोव्हज घालून सरावासाठी मैदानात उतरले. क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच हे चित्र पाहायला

    कोलंबो :  इंग्लंड दौऱ्याहून परतल्यानंतर श्रीलंकेचा बॅटिंग कोच ग्रॅण्ट फ्लॉवर आणि डेटा ऍनलिस्ट जीटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाली. आता श्रीलंकेचे प्रशिक्षक कोरोनाच्या धोक्यापासून बचावासाठी पीपीई किट मास्क आणि ग्लोव्हज घालून सरावासाठी मैदानात उतरले. क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच हे चित्र पाहायला

    मिळाले. भारत-श्रीलंका यांच्यातल्या वनडे सीरिजला 18 जुलैपासून सुरूवात होत आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. इंग्लंड दौऱ्याहून परतलेली श्रीलंकन टीम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर मैदानात सरावासाठी उतरली, पण त्यांच्या चेहऱ्यावर कोरोना व्हायरसची भीती साफ दिसत होती.