Tokyo Olympics : सेमी फायनलमध्ये बेल्जियमकडून भारतीय हॉकी टीमचा पराभव, भारताची आता ‘कांस्य’साठी लढाई

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाला गेल्या 41 वर्षांमध्ये पदकांनी हुलकावणीच दिलेली आहे. उपांत्य फेरीत बेल्जियमचं आव्हान भारताला पेलता आलं नाही. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी कांस्य पदकाची आशा कायम आहे. कांस्य पदकासाठी भारताला आणखी एक सामना खेळण्याची संधी आहे.

    सेमी फायनलमध्ये भारतीय हॉकी संघाचा पराभव झला आहे. बेल्जिअमने भारताचा india vs belgium hockey match 5-2 ने पराभव केला. बेल्जिअमने सामन्याच्या सुरुवातीपासून भारताला दडपणाखाली खेळायला लावलं. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जिअमने गोल केला. भारताने बेल्जिअमशी दोनहात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण बेल्जिअमचा संघ प्रत्येक वेळी भारताला वरचढ ठरला. अखेर बेल्जिअमने भारताचा 5-2 असा पराभव करत फायनलमध्ये जागा मिळवली.

    सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये अगदी सुरुवातीलाच बेल्जियमनं एक गोल डागत आघाडी घेतली होती. पण भारतानं हे आव्हान संपुष्टात आणत बेल्जियमच्या एका गोलच्या बदल्यात दोन गोल करत आघाडी कायम ठेवली होती. पण त्यानंतर मात्र वर्ल्ड चॅम्पियन असलेला बेल्जियमच्या संघानं एकही संधी दिली नाही. संपूर्ण सामन्यात बेल्जियमला 14 पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी तीन पेनल्टी कॉर्नवर गोल डागण्यात ते यशस्वी झाले.

    सेमीफायनल्स सामन्याचा दुसरा क्वार्टरही अत्यंत रोमांचक होता. यामध्ये दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले. सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. दरम्यान, संघाला या पेनल्टी कॉर्नवर गोल डागता आला नाही. सामन्याच्या चौथ्य क्वार्टरमध्ये पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि हेड्रिंक्सनं आणखी एक गोल डागला. या गोलसह बेल्जियमन भारतावर 5-2 अशा फरकानं विजय मिळवला.

    ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाला गेल्या 41 वर्षांमध्ये पदकांनी हुलकावणीच दिलेली आहे. उपांत्य फेरीत बेल्जियमचं आव्हान भारताला पेलता आलं नाही. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी कांस्य पदकाची आशा कायम आहे. कांस्य पदकासाठी भारताला आणखी एक सामना खेळण्याची संधी आहे.

    दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणही भारत विरूद्ध बेल्जियममधील उपांत्य फेरीतील हॉकीचा सामना पाहत असल्याचे ट्विटरवरून सांगितले होते.