भारताला पहिले सुर्वणपदक निश्चित; टेबल टेनिस स्टार भाविना पटेल अंतिम फेरीत दाखल

सेमीफायनलमध्ये भाविना पटेलने जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू मिओचा पराभव केला आहे.

    टोकियो: जपानमधील टोकियो शहरात येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत (Tokyo Paralympics) भारताची स्टार टेबल टेनिस प्लेअर (Star table tennis player) भाविना पटेलनं (Bhavina Patel) अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भाविना पटेल आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून देण्यापासून अवघे एक पाऊल दूर आहे.

    सेमीफायनलमध्ये भाविना पटेलने जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू मिओचा (Miao Zhang)पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढ्यात भाविनाने मिओचा ३-२ असा पराभव केला आहे. भाविनाने अंतिम फेरी गाठत भारतासाठी सुवर्णपदक निश्चित केले आहे.