भारतीय महिला हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये पराभूत, अर्जेंटीना संघाचा 2-1 ने विजय ; आता कांस्यसाठी लढणार

सततच्या आक्रमनानंतर अर्जेंटीना संघाला 36 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर दुसरा गोल मिळाला आहे. त्यामुळे अर्जेंटीना संघाने सामन्यात 2-1 ची आघाडी घेतली आहे.

    भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्यांच्यासमोर बलाढ्य अर्जेंटिनाचे आव्हान होते, तरीही भारतीय महिला संघानं कडवी झुंज दिली. १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी चौथे स्थान पटकावले होते. त्यानंतरची ही महिला संघाची सर्वोत्तम कामगिरी आहे.

    सततच्या आक्रमनानंतर अर्जेंटीना संघाला 36 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर दुसरा गोल मिळाला आहे. त्यामुळे अर्जेंटीना संघाने सामन्यात 2-1 ची आघाडी घेतली आहे. भारतीय महिला संघानं उपांत्य फेरीचा हा सामना गमावला असला तरी त्यांना कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.

     

    राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ३६ वर्षांनंतर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली होती आणि त्याच संघानं आता पाच वर्षांनी थेट उपांत्य फेरीत धडक देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ४१ वर्षांपूर्वी भारतीय महिला संघ चौथ्या स्थानावर राहिला होता आणि ती त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.