भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने व्यक्त केली दिलगिरी

भारताचा बॅडमिंटनपटू एच.एस.प्रणॉयने भारतीय बॅडमिंटन संघटनेसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे. मनिला येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न खेळता किदम्बी

भारताचा बॅडमिंटनपटू एच.एस.प्रणॉयने भारतीय बॅडमिंटन संघटनेसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे.   मनिला येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न खेळता किदम्बी श्रीकांत आणि प्रणॉय हे दोघेही बार्सिलोना येथे अन्य स्पर्धा खेळण्यासाठी निघून गेले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या कृत्याबद्दल श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केली होती.

त्यानंतर  एच.एस.प्रणॉयने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. परंतु शिफारस न केल्यामुळे त्याने संघटनेवर टीका करून, नाराजी व्यक्त केली होती. या मागील नक्की कारण काय आहे, याबाबत कारणे दाघवा अशीही नोटीस त्याने पाठवली होती. त्यामुळे त्याने या गैरकृत्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त केली आहे.   

दरम्यान, भारतीय बॅडमिंटनपटू संघटनेचे सचिव अजय सिंघानिया म्हणाले की, प्रणॉयसारख्या खेळाडूकडून आम्हाला अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती. परंतु त्याने संघटनेची माफी मागितल्याने त्याच्या नावाची शिफारस खेलरत्न पुरस्कारासाठी करायची अथवा नाही, याचा आम्ही लवकरच विचार करणार आहोत.