pv sindhu

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्य पदक मिळवले आहे. दोन ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आणि दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे.

    भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्य पदक मिळवले आहे. दोन ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आणि दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे. याआधी सुशिल कुमारने कुस्तीमध्ये दोन पदक मिळवली होती.

    सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. कांस्यपदकासाठीच्या लढतीत सिंधूने ५२ मिनिटाच चीनच्या हे बिंग जिआओवर २१-१३, २१-१५ असा विजय मिळवला. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली होती.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांनी ठेवलेल्या अपेक्षाला साजेसा खेळ करत पी.व्ही. सिंधूने पदकाची कमाई केली आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सिंधूने ब्राँझ पदकाच्या सामन्यात चीनच्या हे बिंग जिआओवर सरळ दोन सेटमध्ये मात करत सामना जिंकला.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे दुसरं पदक ठरलं. २१-१३, २१-१५ च्या फरकाने सरळ दोन सेट जिंकत सिंधूने कांस्यपदकाची कमाई केली. रिओ पाठोपाठ टोकियो ऑलिम्पिकमध्येही पदकाची कमाई करत सिंधूने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं.