टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठा धक्का, रवी शास्त्रींनंतर आणखी एकाला कोरोनाची लागण

भारतीय क्रिकेट संघाचे कनिष्ठ फिजिओ योगेश परमार यांची कोविड -१९ चाचणी सकारात्मक आली आहे, ज्यामुळे शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीपूर्वी संघाला सराव सत्र रद्द करावे लागले. भारतीय संघाचा अंतिम सामना शुक्रवारी मँचेस्टरमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे.

    भारत आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून क्रिकेटवर कोरोनाचे सावट पडताना दिसत आहे. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता भारतीय संघामधून अजून एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला सामन्यापूर्वी सराव सत्र रद्द करावे लागले आहे.

    भारतीय क्रिकेट संघाचे कनिष्ठ फिजिओ योगेश परमार यांची कोविड -१९ चाचणी सकारात्मक आली आहे, ज्यामुळे शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीपूर्वी संघाला सराव सत्र रद्द करावे लागले. भारतीय संघाचा अंतिम सामना शुक्रवारी मँचेस्टरमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला या घटनेची माहिती दिली आणि अंतिम कसोटीवर नवीन संकट आले आहे.

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाईल. सध्या भारतीय संघ सध्याच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.