Indian cricketer Dinesh Karthik signs BlitzPoker deal for Blitz Premier League
भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने ब्लिट्झ प्रीमियर लीगसाठी केला ब्लिट्झपोकरशी करार

भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक-फलंदाज आणि सध्या चाललेल्या आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार असलेला दिनेश कार्तिक हा आता ब्लिट्झ प्रीमियर लीगचा चेहरा आहे.

  • नवीन व पूर्वीपासूनच्या ब्लिट्झपोकर खेळाडूंना मिळणार ५० लाख रुपये मूल्याची बक्षिसे

नवी दिल्ली : भारतात (India) सध्या चाललेला क्रिकेट कार्निवल (cricket carnival) साजरा करण्यासाठी डॅन बिल्झेरियनची अधिकृत पोकर रूम ब्लिट्झपोकरने ब्लिट्झ प्रीमियर लीग Blitz Premier League (बीपीएल) लाँच करण्यासाठी प्रख्यात भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकशी (Dinesh Kartik) करार केला आहे. भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक-फलंदाज आणि सध्या चाललेल्या आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार असलेला दिनेश कार्तिक हा आता ब्लिट्झ प्रीमियर लीगचा चेहरा आहे. दिनेश कार्तिकने २००४ मध्ये भारतीय क्रिकेट संघात (Indian cricket team) पदार्पण केले आणि २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने संघासाठी सर्वाधिक धावा करून, भारताला २१ वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय मिळवून देण्यात मदत केली.

पोकरबद्दलच्या प्रेमाची सांगड क्रिकेटशी घालून भारतीय चाहत्यांना अजोड रोमांचक अनुभव देणे हे उद्दिष्ट असलेली ब्लिट्झ प्रीमियर लीग म्हणजे २१ सप्टेंबर २०२० पासून सुरू झालेली एक ऑनलाइन पोकर स्पर्धा आहे. या ४५ दिवस चालणा-या स्पर्धेमध्ये अनेक रोमांचक वळणे येतील आणि नवीन व पूर्वीपासूनच्या ब्लिट्झपोकर खेळाडूंना ५० लाख रुपये मूल्याची बक्षिसे दिली जातील. भारतभरातील नवीन खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी ब्लिट्झपोकरतर्फे BLITZPOKER ब्लिट्झ प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. रोचक बाब म्हणजे, ऑनलाइन गेमिंग केवळ महानगरांतील प्रकार आहे या लोकप्रिय समजाला छेद देत, श्रेणी-२ शहरांतूनही ऑनलाइन गेमिंगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही लोकसंख्यांमध्ये कमी किंमतीच्या स्मार्टफोन्सची वाढती संख्या हा या वाढीचा प्रमुख चालक घटक आहे.

क्रिकेटप्रमाणेच पोकरसाठीही विशिष्ट कौशल्यांचा संच आवश्यक असतो. ही कौशल्ये संपादित करण्यासाठी समर्पण, कष्ट आणि सरावाची आवश्यकता असते. ब्लिट्झ प्रीमियर लीग ही एक अनोखी ऑनलाइन पोकर स्पर्धा आहे आणि पोकर चाहत्यांसाठी हा नक्कीच रोमांचक अनुभव ठरेल. ब्लिट्झपोकरशी भागीदारी हा माझा या खेळाला पाठिंबा देण्याचा आणि खेळाडूंप्रती आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.

दिनेश कार्तिक

ब्लिट्झ प्रीमियर लीग अर्थात बीपीएल BPL दररोज ७५,००० रुपये बक्षिसाच्या बीपीएल स्ट्रायकर स्पर्धा घेणार आहे. खेळाडू केवळ ११० रुपयांची प्रवेशिका (गुंतवणूक) घेऊन या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

दिनेश कार्तिकशी झालेल्या भागीदारीबद्दल, इंटरनेट रॉयल्टीबद्दल डॅन बिल्झेरियन म्हणाले, “या स्पर्धेसाठी दिनेश कार्तिकच्या क्षमतेचा क्रिकेटपटू आमच्यासोबत असणे हा खरोखर थरारक अनुभव आहे. मी त्याचे आमच्या परिवारात स्वागत करतो आणि या सहयोगाने आमचा उत्साह खूप वाढवला आहे. तो केकेआरचा कर्णधार असल्याने आगामी सामन्यांसाठी मी त्याला शुभेच्छा देतो. पोकर या खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी जे कष्ट आणि समर्पण आवश्यक असते, त्याचे कार्तिक प्रतिक आहे.” बिल्झेरियन स्पर्धेबद्दल पुढे म्हणाले, “भारतीयांचे क्रिकेटवर असलेले प्रेम आणि त्याचबरोबर अत्यंत कौशल्याचा खेळ पोकर हे दोन्ही साजरे करण्याचा ब्लिट्झ प्रीमियर लीग हा एक मार्ग आहे. भारतातील पोकर समुदाय या खेळाप्रती असलेले प्रेमही दाखवून देईल असे आम्हाला अपेक्षित आहे आणि ते बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

या काळात सहभागी होणा-या सर्व नवीन सदस्यांना त्यांच्या पहिल्या ठेवींवर रोमांचक ऑफर्सचा लाभ मिळेल. ॲपवरील नवीन वापरकर्त्यांना ७५,००० रुपये मूल्याच्या जीटीडी दैनंदिन बीपीएल स्ट्रायकर स्पर्धेचे तिकीट मोफत मिळेल. सदस्य ब्लिट्झ प्रीमियल लीगसाठी या वेबसाइटवर www.blitzpoker.com नोंदणी करू शकतात आणि गेमचा फॉरमॅट टेक्सास होल्ड’एम असेल.

ब्लिट्झ प्रीमियर लीगची प्रमुख वैशिष्ट्ये:

१) ब्लिट्झ प्रीमियर लीग ५० लाख रुपयांची बक्षिसे व स्पर्धा देऊ करते

२) या मालिकेत २१ सप्टेंबर २०२०पासून ७५,००० रुपये दैनंदिन बक्षीसमूल्य असलेली बीपीएल स्ट्रायकर स्पर्धा सुरू होत आहे

३) ब्लिट्झ प्रीमियर लीगदरम्यान BLITZPOKER.COMवर नोंदणी करणा-या नवीन वापरकर्त्यांना 75के जीटीडी डेली बीपीएल स्ट्रायकर स्पर्धेचे मोफत तिकीट मिळेल

४) ५ भाग्यवान विजेत्यांना ब्लिट्झपोकर टीमतर्फे दररोज मोफत मर्चंडाइज मिळेल

ब्लिट्झ प्रीमियर लीगमध्ये बीपीएल बोनांझाचाही समावेश आहे, यामध्ये खेळाडूंना असंख्य मर्चंडाइज जिंकण्याची, अफलातून डिपॉझिट ऑफर्स क्लेम करण्याची संधी मिळेल आणि या क्रिकेट हंगामादरम्यान झालेल्या सर्व नवीन नोंदण्यांसाठी रोमांचक डिल्सही मिळतील.

ब्लिट्झ प्रीमियर लीग दररोज भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:३० वाजता ब्लिट्झपोकर प्लॅटफॉर्मवर होणार आहे. ब्लिट्झ प्रीमियर लीगच्या नियम व अटींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया https://www.blitzpoker.com/ या वेबसाइटला भेट द्या आणि @blitzpokerofficial ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा.