बीसीसीआयच्या पगारापेक्षा ब्रँड्समधून अधिक कमावतात भारताचे क्रिकेटपटू, कसं ते जाणून घ्या

ग्रेड A+ मधील खेळाडूला वर्षाला 7 कोटी, ग्रेड A साठी 5 कोटी , ग्रेड B मधील खेळाडूला 3 आणि ग्रेड Cमधील खेळाडूला 1 कोटी पगार दिला जातो. त्यांनी वर्षाला कितीही सामने खेळले तरी त्यांना हा पगार मिळतोच.

  बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे आणि 2020मध्ये त्यांनी जवळपास 3200 कोटी रुपयांची कमाई केली. जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये भारतीय खेळाडू आघाडीवर आहेत. बीसीसीआयनं त्यांच्या खेळाडूंची A+, A, B, C अशा चार ग्रेडमध्ये विभागणी केली आहे.

  ग्रेड A+ मधील खेळाडूला वर्षाला 7 कोटी, ग्रेड A साठी 5 कोटी , ग्रेड B मधील खेळाडूला 3 आणि ग्रेड Cमधील खेळाडूला 1 कोटी पगार दिला जातो. त्यांनी वर्षाला कितीही सामने खेळले तरी त्यांना हा पगार मिळतोच. करारबद्ध खेळाडू वर्षाला एकही सामना खेळला नाही तरी त्याला तो पगार मिळणार. पण, बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पगारापेक्षा ब्रँड्समधून भारतीय क्रिकेटपटू अधिक रक्कम कमावतात.

  बीसीसीआयच्या करारानुसार शिखर धवनला वर्षाला 5 कोटी इतका पगार मिळतो. तो GS Caltex, boAt आणि Alcis Sports या ब्रँड्ससोबत काम करतो आणि त्यासाठी त्याला 5.2 कोटी इतकी रक्कम मिळते. धवननं नुकताच DaOne हा स्वतःचा होम डेकोर ब्रँड लाँच केला आहे.

  विराट कोहली हा ब्रँड्समधून कमाईच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहे. बीसीसीआयकडून त्याला 7 कोटी पगार मिळतो आणि त्याची ब्रँड्समधून कमाई ही 146 कोटी इतकी आहे. Puma, MRF Tyres आणि Audi या मोठ्या कंपनींसोबत त्याचा करार आहे.

  रोहित शर्मा ( Rohit Sharma – 7.2 crores ) – भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा यानं तीनही फॉरमॅटमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. बीसीसीआयनं त्याचा समावेश ग्रेड ए+ खेळाडूंमध्ये केला आहे आणि त्याला 7 कोटी इतका पगार मिळतो. पण, रोहित 7.2 कोटी हे ब्रँड्स जाहीरातीतून मिळवतो. त्यानं Adidas, Hublot आणि Aristocrat Bags आदी कंपनींसोबत करार केला आहे.

  तर  हार्दिक पांड्यानं ब्रँड्समधून कमाईच्या बाबतीत रोहितलाही मागे टाकले आहे. Gillette, Gulf Oil आणि Oppo mobiles या कंपनींसोबत तो काम करतो आणि त्याची ब्रँड्समधून कमाई ही 14 कोटी इतकी आहे.