इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेटपटू सज्ज

भारतीय संघातील खेळाडूंनी कोरोनावरील लशीचा पहिला डोस भारतात घेऊन इंग्लंडला रवाना झाले होते. त्यानंतर इंग्लंडमध्ये खेळाडूंना दुसरा डोस 7 आणि 9 जुलैला देण्यात आला. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्विसेसच्या मदतीने खेळाडूंना दुसरा डोस देण्यात आला होता. 

    लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) न्यूझीलंडकडून (New Zealand) आठ विकेट्सने पराभूत झाला आणि जगातील पहिला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन (WTC) होण्यापासून थोडक्यात राहिला. या पराभवानंतर आता भारतीय संघ पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी आपली पहिली कसोटी मालिका इंग्लंडच्या भूमितच इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.

    4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या सामन्यांपूर्वी भारतीय संघ सुट्टीवर विश्रांती घेण्यासाठी म्हणून सुट्टीवर होता. आता ही सुट्टी संपवून भारताचे खेळाडू कसोटी सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत.