‘असा’ सुरु झाला भारतीय गोल्फर आदिती अशोकचा गोल्फमधील प्रवास…

आदिती अशोक वयाच्या पाचव्या वर्षांपासून गोल्फ खेळायला सुरुवात केली. या खेळासाठी तिच्या वडिलांनी तिला प्रशिक्षण आणि खेळास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.

    भारतीय गोल्फर अदिती अशोकने टोकियो ऑलिम्पिक(Tokyo Olympic )मधील पदक गमावाले असले, तरी देशवासीयांची मने मात्र २३ वर्षीय आदितीने जिंकली आहे. गोल्फर अदितीला स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. मात्र गोल्फमध्ये पदकाच्या आशा पल्लवीत केलेल्या आदितीने आपल्या शानदार आणि उत्कृष्ट खेळीने भारतीयांची मने जिंकली आहेत. पदकाच्या आशा पल्लवीत करणाऱ्या आदितीच्या जाणून घ्या गोल्फमधील प्रवास

    असा सुरू झाला गोल्फचा प्रवास

    बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या(२९ मार्च १९९८)आदिती अशोक वयाच्या पाचव्या वर्षांपासून गोल्फ खेळायला सुरुवात केली. या खेळासाठी तिच्या वडिलांनी तिला प्रशिक्षण आणि खेळास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्यावेळी बेंगळुरूमध्ये अंत्यत मोजके म्हणजेच तीनच गोल्फ कोर्स होते.  भारताची पहिली महिला गॉल्फर म्हणून नावारूपाला आलेली आदिती २०१७मध्ये पहिली भारतीय महिली प्रोफेशनल गोल्फ असोसिएशन (LPGA) ची खेळाडू बनली. लल्ला आयचा टूर स्कूलचे विजेतेपद पटकावणारी ती सर्वात तरुण भारतीय म्हणूनही आदिती ओळखली जाते. या कामगिरीमुळे तिला २०१६ च्या सीझनसाठी लेडीज युरोपियन टूर कार्डचे तिकीट मिळाले होते.

    ‘या’ स्पर्धांमध्येही सहभागी

    एशियन यूथ गेम्स (२०१३) ,
    यूथ ऑलिम्पिक गेम्स (२०१४)
    एशियन गेम्स (२०१४)
    रिओ ऑलिम्पिक ( २०१६) मध्येही सहभागी होत आपल्या खेळाचे प्रदर्शन केले होते.

    कसा असतो गोल्फचा स्कोर

    • एक स्टैंडर्ड कोर्समध्ये १८ छिद्र असतात.
    • प्रत्येक छिद्रात बॉल टाकण्यासाठी शॉट्सची संख्या पूर्व-निर्धारित असते. त्यामुळे खेळाडूला कमीत कमी शॉटमध्ये प्रत्येक छिद्रला कव्हर करण्याचा प्रयत्न करावा लागतो.
    • जर एका छिद्रासाठी ५ शॉट्स असतील आणि खेळाडूने त्या ५ शॉट्समध्ये चेंडू टाकला तर त्याला समान गुण मिळतात जर त्याने४ शॉट्समध्ये बॉल टाकला तर त्याला बर्डी म्हणतात. जर त्याने ५ शॉट्स होलसाठी फक्त ३ शॉट घेतले तर त्याला गरुड म्हटले जाते.
    • जर एखाद्या खेळाडूने निश्चित फटक्यापेक्षा जास्त शॉटमध्ये बॉल घातला तर त्याला बोगी म्हणतात. आपण आणखी दोन शॉट्स जास्त घेतल्यास त्याला दुहेरी बोगी म्हणतात.
    • १८ छिद्रांसाठी एकूण ७१ शॉट्स निर्धारित केले असतात . आदितीने पहिल्या फेरीत ६७ , दुसऱ्या फेरीत ६६ आणि तिसऱ्या फेरीत ६८ शॉट्स घेतले आहेत. त्याचा एकूण गुण १२ अंडर २०१ आहे. म्हणजेच, निर्धारित २१३ शॉट्सऐवजी तिने फक्त २०१ शॉट्स घेतले त्याचप्रमाणे, क्रमांक -१ वर धावणाऱ्या कोर्डाने केवळ १९८ शॉट्स घेतले आहेत.