टीम इंडियाला मोठा झटका, प्रशिक्षक रवी शास्त्रींना कोरोनाचा विळखा

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शास्त्रींसमवेत टीमच्या ४ सपोर्ट स्टाफला सुद्दा क्वारंटाईन व्हावं लागलं आहे.

    लंडन :  टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथा दिवस आहे. परंतु सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शास्त्रींसमवेत टीमच्या ४ सपोर्ट स्टाफला सुद्दा क्वारंटाईन व्हावं लागलं आहे.(Ravi Shastri has tested positive for COVID-19 )

    बीसीसीआयच्या मेडिकल टीमने शनिवारी संध्याकाळी शास्रींचा लेटरल फ्लो टेस्ट सकारात्मक आल्यानंतर खबरदारी म्हणून रवी शास्त्री, मुख्य प्रशिक्षक, बॉलिंगचे प्रशिक्षक बी अरूण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि नितीन पटेल, फिजिओथेरपिस्टचे वलगीकरण करण्यात आले आहे.

    त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. ही संपूर्ण टीम आता हॉटेलमध्ये राहणार आहे आणि वैद्यकीय पथकाकडून टीम इंडियाबाबत जोपर्यंत सकारात्मक माहिती समोर येत नाही. तोपर्यंत त्यांच्यासोबत खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

    परंतु एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाच्या उर्वरित सदस्यांच्या दोन चाचण्या करण्यात आल्या आहेत. (एक काल रात्री आणि दुसरी आज सकाळी) आणि ओव्हलमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवसासाठी सर्व नकारात्मक चाचणीनंतर परवानगी देण्यात आली आहे.